‘स्कोडा कुशाक’चे लवकरच पदार्पण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १० जानेवारी – स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या मध्यम विभागातील तसेच ‘इंडिया 2.0’ प्रकल्पांतर्गत तयार केलेल्या आणि डिझाईन केलेल्या पहिल्याच एसयुव्हीचे ‘स्कोडा कुशाक’ गाडीचे लवकरच पदार्पण होणार आहे. “नव्या स्कोडा कुशाकमध्ये ब्रॅण्डच्या कालातीत डिझाईन, अतुलनीय परफॉर्मन्स, उच्चतम बांधणीचा दर्जा, अप्रतिम मूल्य आणि विकसित सुरक्षा तसेच सुरक्षितता असा अप्रतिम मेळ साधला आहे. या वर्गातील ही सर्वोत्कृष्ट गाडी ठरणार आहे.

कार्यक्षमता, व्यवहार्यता, मुबलक जागा आणि सोय याबाबतीत ही गाडी नवे मापदंड स्थापित करेल’’, असा दावा स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्ड डायरेक्टर श्री. झॅक होलिस यांनी केला आहे. स्कोडा कुशाक या नव्या निर्मितीतून पुढील 18 महिन्यांत येऊ घातलेल्या नव्या वाहनांची नांदी झाली आहे. देशातील चोखंदळ ग्राहक तसेच जगभरातील इतर उदयनशील अर्थव्यवस्थांमधील ग्राहकांच्या गरजा आणि मागण्या पूर्ण करण्याच्यादृष्टीने ही निर्मिती करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *