कौतुकास्पद! ४ भारतीय महिला पायलट्सने रचला इतिहास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १२ जानेवारी -जगभरात भारतीय महिला आपल्या देशाचं नाव उंचावेल अशी कामगिरी करत आहेत. भारतीय महिला पायलट्स यांनी देखील आपण काही कमी नाहीत हे दाखवून दिलं आहे. ही बातमी आहे एअर इंडियाच्या ४ महिला पायलट्सची…..

अमेरिकेतली सिलिकॉन व्हॅली ते भारतातली सिलीकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूपर्यंतचा सलग प्रवास एका विमानानं केला. अमेरिकेतल्या सॅनफ्रॅन्सिस्कोमधून एका विमानानं दोनशे प्रवाशांना घेऊन टेकऑफ केलं. आणि बंगळुरूच्या कॅम्पेगौडा एअरपोर्टवर लँडिंग केलं. तुम्हाला वाटेल यात काय विशेष…. पण त्यामागची ही बातमी महत्वाची आहे.

एअर इंडियाच्या या फ्लाईटनं सॅनफ्रॅन्सिस्को ते बंगळुरू असा १६ तासांचा सलग प्रवास केला आहे. कुठेही लँडिंग न करता हा प्रवास पूर्ण केला असल्यामुळे सर्वच स्तरावरून यांचं कौतुक होत आहे. महत्वाची बाब म्हणजे या फ्लाईटच्या सगळ्या पायलट्स या महिला होत्या. तसेच सगळ्या क्रू मेंबर्सही महिलाच होत्या. या प्रवासात १० टन इंधनाचीही बचत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *