Flipkart ची जबरदस्त ऑफर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १४ जानेवारी – वॅालामार्टच्या (Wallmart) मालकीचा ई-कॉमर्स प्लॅटफार्म (Platform) असलेल्या फ्लिपकार्टने `फ्लिपकार्ट स्मार्ट पॅक` (Flipkart Smart Pack) ही सबस्क्रिप्शनवर आधारित एक ऑफर ग्राहकांसाठी सादर केली आहे. या अंतर्गत ग्राहकांना नवीन स्मार्टफोन (SmartPhone) खरेदीवर 12 किंवा 18 महिन्यांच्या कालावधीनंतर मनी बॅक (Money Back) गॅरंटीचा लाभ मिळणार आहे. या ऑफर अंतर्गत 17 जानेवारीपासून 12 किंवा 18 महिन्यांचे स्मार्टपॅक सबस्क्रिप्शन (Subscription) घेता येणार आहे. ग्राहक नवा स्मार्टफोन फ्लिपकार्ट अॅपवर मनी बॅक गॅरंटीसह खरेदी करु शकणार आहेत. ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करताना त्याची खरेदी किंमत द्यावी लागणार आहे. त्यानंतर 100 टक्के मनी बॅक गॅरंटी मिळण्यास पात्र ठरावे यासाठी स्मार्टपॅक अंतर्गत दरमहा विशिष्ट शुल्क ग्राहकांना भरावे लागणार आहे.

या सबस्क्रिप्शन सेवेअंतर्गत ग्राहकांना विविध प्रकारच्या स्मार्टफोनसह सोनीलिव्ह (Sonyliv), झी5 प्रिमियम (Zee 5 Primium), व्हुट सिलेक्ट (Voot Select), झोमॅटो प्रो (Zomato Pro) यांसारख्या स्ट्रिमिंगसेवा मिळणार असून त्यांचा महिन्याच्या शुल्कामध्येच समावेश असेल.युएस आणि युरोपच्या धर्तीवर अशा प्रकारची योजना भारतात (India) प्रथमच राबवली जात आहे.

अन्य मार्केटसमध्ये टेलिकाम कॅरिअर्स (Telecom Carriers) कस्टमर्ससाठी कंत्राटी डिल्स ऑफर करतात. त्या माध्यमातून डिव्हाईस व अन्य सेवांसाठी दरमहा निश्चित शुल्क आकारले जाते, तसेच नवे व्हेरिएंट आल्यानंतर ते अपग्रेड (Upgrade) केले जाते. मात्र फ्लिपकार्ट ग्राहकांना स्मार्टपॅक सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून वाजवी दरात स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देत आहे. ज्यामुळे ग्राहकांना शिक्षण (Education), आरोग्यसेवा (Health Services) किंवा करमणूक (Entertainment) यांसारख्या महत्वपूर्ण सेवा सहजपणे मिळवता येतील. फ्लिपकार्टचे स्मार्टपॅक सबस्क्रिप्शन टायर 3 मार्केटबाहेरील महानगरे आणि प्रदेशात दाखल झाले आहे. परवडणारे आणि मध्यम प्रिमीयम असल्याने पोस्ट पॅनडेमिक (Post Pandemic) मार्केटमध्ये यास जोरदार मागणी असेल, असा अंदाज आहे.

फ्लिपकार्टने तयार केलेल्या या आफर अंतर्गत युझर्स मनी बॅकच्या (Money Back) टक्केवारीनुसार गोल्ड (Gold), सिल्व्हर (Silver) किंवा ब्राँझ पॅकस घेऊ शकतात. या कार्यक्रमानुसार ग्राहकांना त्यांच्या नवीन स्मार्टफोनची किंमत भरावी लागेल त्यानंतर ते इच्छित कालावधीचे स्मार्टपॅक निवडू शकतात. त्यानंतर युझर्स (Users) किंवा ग्राहकांना दरमहा एक ठराविक शुल्क भरावे लागेल, ते त्यांनी निवडलेल्या पॅकवर अवलंबून असेल. या पॅकची रेंज 399 रुपयांपासून सुरु होईल. स्मार्टपॅकचा कालावधी संपल्यानंतर ग्राहक त्यांनी खरेदी केलेला स्मार्टफोन फ्लिपकार्टकडे जमा करु शकतात. त्यानंतर मनी बॅकची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा होईल. मात्र हे मनी बॅक स्मार्टफोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. स्मार्टपॅकमध्ये समाविष्ट विविध योजनांमध्ये सोनीलिव्ह (Sony Liv), झी5(Zee5) प्रिमीयम, व्हूट सिलेक्ट (Voot Select), झोमॅटो प्रो (Zomzto Pro), क्लटलिट लाइव्ह (Cult.lit live), प्रॅक्टोप्लस(ProctoPlus) आदींचा समावेश आहे. रिअलमी (Realme), पोको (Poko), सॅमसंग (Samsung), रेडमी (Redmi), मोटोरोला (Motorola), इन्फिनिक्स (Infinix), ओप्पो (Oppo), व्हिवो (Vivo) यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या 6000 ते 17000 रुपये किंमतीच्या स्मार्टफोन्सवरच युझर्स आपल्या पसंतीच्या सबस्क्रिप्शन प्लॅनचा वापर सुरुवातीला करु शकतील. तसेच युझर्स या स्मार्टपॅकचा भाग असलेल्या फॅशन (Fashion) आणि हॉस्पिटॅलिटी ब्रँड्सच्या (Hospitality Brands) विविध आफर्सचा लाभ देखील घेऊ शकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *