पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं घेतला महत्वाचा निर्णय ; आता थेट ‘आकाशवाणी’वरुन इंग्रजीचे धडे!

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १६ जानेवारी – कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदा शालेय विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शाळा सुरु नसल्यानं विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठ्या अडचणी येत आहेत. शाळेसह ट्यूशन क्लासेसही बंद आहेत. या विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता आकाशवाणीवरुन इंग्रजीचे धडे दिले जाणार आहेत.(Students in Pune district will be given English lessons through All India Radio)

इंग्रजी हा ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना जड जाणारा विषय. त्यात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शाळा बंद. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीची भीती अजूनच वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही भीती दूर करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे देण्यासाठी आता थेट आकाशवाणीचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ‘आम्ही इंग्रजी शिकतो’ या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

आकाशवाणीवरील इंग्रजीचे धडे कधीपासून?
येत्या 19 जानेवारी ते 26 मार्च 2021 दरम्यान इयत्ता 4 थी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना 84 धडे शिकवण्यात येणार आहेत. 26 जानेवारी, 19 फेब्रुवारी आणि 11 मार्च हे तीन दिवस वगळून सोमवार ते शनिवार ठराविक वेळेत आकाशवाणीवरुन इंग्रजी विषयाचे धडे दिले जाणार आहेत. सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस या संस्थेकडून हे धडे गिरवले जाणार आहेत. बाकी 9 वी आणि 10 वीचे वर्ग सुरु करण्यात आल्यामुळे त्यांच्यासाठी आकाशवाणीचा वापर केला जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *