मालिकेत आतापर्यंत भारतीय संघच सर्वोत्तम , शेन वॉर्नने दिला ऑस्ट्रेलियाच्या संघावर सडकून टीका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १८ जानेवारी – ऑस्ट्रेलियाचा माजी महान क्रिकेटपटू शेन वॉर्नने यावेळी आपल्याच स संघावर जोरदार टीका करत असताना वॉर्नने भारतीय संघाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे. वॉर्नने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारावर तोफ डागल्याचेही पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या संघावर जोरदार टीका करत असताना त्यांच्या रणनितीबाबतही वॉर्नने आपले मत व्यक्त केले आहे.

वॉर्न यावेळी म्हणाला की, ” या मालिकेत आतापर्यंत भारतीय संघच सर्वोत्तम राहिलेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला ही मालिका जिंकण्याच्या बऱ्याच संधी मिळाल्या, पण त्यांना या संधीचे सोने करता आले नाही. माझ्यामते ऑस्ट्रेलियाचा संघाची रणनिती या मालिकेत फसल्याची पाहायला मिळाली. कर्णधार म्हणून टीम पेनकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली नाही. पण दुसरीकडे मात्र भारताच्या संघाने या मालिकेत दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले.”

वॉर्न पुढे म्हणाला की, ऑस्ट्रेलियाच्या संघाने काही गोष्टी करणे गरजेचे होते. पण पेनकडून एक कर्णधार म्हणून या गोष्टी पाहायला मिळाल्या नाहीत. यष्टीरक्षक म्हणूनही पेन अपयशी ठरला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनाही यावेळी चांगली कामगिरी करता आलेली नाही. तिसऱ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाच्या संघाने निराशाच केली. त्याचबरोबर आता चौथ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून बऱ्याच चुका झाल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारतीय संघाने यावेळी भरपूर चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले.”

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा दिवस चांगलाच रंगतदार ठरला. ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारताने ३०० धावांच्या आतमध्येच रोखले. मोहम्मद सिराजने यावेळी पाच विकेट्स मिळवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले, तर शार्दुल ठाकूर चार विकेट्स मिळवत त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे पाचव्या दिवशी आता विजयासाठी भारताला ३२४ धावांची गरज आहे. पहिल्या दिवसअखेर रोहित शर्माच्या चौकाराच्या जोरावर भारताची बिनबाद ४ अशी धावसंख्या आहे. त्यामुळे आता सामन्याच्या पाचव्या दिवशी कोणत्या संघाचा विजयी झेंडा फडकणार, याची उत्सुकता सर्वच क्रिकेट चाहत्यांना असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *