राजस्थान रॉयल्सने स्टीव्ह स्मिथला दाखवला बाहेरचा रस्ता ; हा धडाकेबाज खेळाडू असेल नवा कर्णधार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २१ जानेवारी – आयपीएलची फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सने संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला रिलीज केलं आहे. तो आयपीएल 2021 मध्ये संघाकडून खेळताना दिसणार नाही. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात या संघाची कामगिरी युएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2020 मध्ये काही खास नव्हती. स्टीव्ह स्मिथबाबत निर्णय घेण्यासाठी टीम मॅनेजमेंटकडून बरीच चर्चा झाली आणि पुन्हा निर्णय घेण्यात आला. संघासाठी स्मिथ काही खास कामगिरी करू शकला नसला तरी तो फलंदाजांइतकाही प्रभावी ठरला नव्हता.

राजस्थानच्या फ्रेंचायझीकडून असे सांगितले जात आहे की, संघाचा कर्णधार म्हणून संजू सॅमसनची नियुक्ती करण्यात आली आहे. आता स्टीव्ह स्मिथच्या जागी तो संघाचं कर्णधारपद सांभाळणार असून कुमार संगकाराला संघाचा नवा संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. स्टीव्ह स्मिथसह वरुण अॅरोन, अंकित राजपूत, टॉम कुर्रन यांना देखील बाहेर करण्यात आलं आहे.

स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात राजस्थानने आयपीएल 2020 मध्ये 14 लीग सामने खेळले त्यापैकी 6 सामने जिंकले आणि 8 सामन्यात पराभव झाला. गुणतालिकेत ते शेवटच्या स्थानी होते. स्टीम स्मिथच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर त्याने या मोसमात 14 सामन्यांत 25.9.9 च्या सरासरीने 311 धावा केल्या ज्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता. आयपीएलच्या 13 व्या सत्रात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 69 होती आणि त्याचा स्ट्राइक रेट 131.22 होता.

संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, अँड्र्यू टे, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडे, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, रॉबिन उथप्पा यांना राजस्थान रॉयल्सने कायम ठेवले आहे.

स्टीव्ह स्मिथ, अंकित राजपूत, ओशान थॉमस, आकाश सिंग, वरुण आरोन, टॉम कुरन, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंह यांना संघातून बाहेर केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *