टीव्हीएस, होंडाकडून आपल्या दमदार दुचाकी बाजारात सादर केल्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २१ जानेवारी – ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपन्या टीव्हीएस आणि हेंडा यांनी नुकत्याच आपल्या दमदार दुचाकी बाजारात सादर केल्या आहेत. ज्युपिटरची नवी आवृत्ती टीव्हीएसने आणि होंडाने ग्रेझिया स्पोर्ट्स ही गाडी लाँच केली आहे.

टीव्हीएसने एसएमडब्लू नावाने ज्युपिटरची नवी आवृत्ती सादर केली असून जिची किंमत 64 हजार रुपयांच्या घरात असेल असे सांगितले जात आहे. यात एकूण 5 प्रकारच्या गाडय़ा असतील असे कंपनीने म्हटले आहे. ज्युपिटर स्टँडर्डची (एक्स शोरुम, दिल्ली) किंमत 65 हजार 497 रुपये तर टीव्हीएस ज्युपिटर झेडएक्सची किंमत 68 हजार 247 असणार आहे. याचप्रमाणे झेडएक्स डिस्कची किंमत 72 हजार 347 आणि क्लासिकची किंमत 72 हजार 472 रुपये असणार आहे. 110 सीसीचे इंजिन, एलईडी हेडलँप व टेललँप, युएसबी चार्जर अशा सुविधा यात असणार आहेत.

जपानची दुचाकी कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कुटर इंडियाने ग्रेझिया स्पोर्ट्स ही नवा स्कुटरेट प्रकारातील गाडी नुकतीच लाँच केली आहे. 125 सीसीच्या या नव्या गाडीची किमत 82 हजार रुपयांच्या घरात असणार आहे. खासकरून युवकांना समोर ठेऊन कंपनीने त्यांना आवडेल अशी स्टायलीश आणि स्पोर्टी दुचाकी तयार केली आहे. सदरच्या गाडीला 190 मिलीमिटरचा प्रंट डिस्कबेक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *