मास्टरमाइंड भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जन्मदिन, शुभेच्छांचा महापूर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २१ जानेवारी – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा 20 जानेवारी रोजी वाढदिवस होता. पाकिस्तानात अंडर कव्हर एजेंट राहिलेल्या डोवाल यांनी शत्रूदेशात वेश बदलून भारतीय गुप्तचर यंत्रणेसाठी 7 वर्षांपर्यंत काम केले आहे. कर्तबगारीमुळेच डोवाल यांचे देशभरात असंख्य चाहते असून त्या सर्वांनी समाजमाध्यमांनी देशाच्या या खऱया नायकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

जेम्स बाँडशी तुलना
अजित डोवाल यांनी भारतीय सैन्याकडून पाकिस्तानात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा मास्टरमाइंड मानले जाते. त्यांच्या गुप्त कामगिरींमुळेच लोक त्यांची तुलना जेम्स बाँडशी करतात. विक्रांत नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने त्यांना भारताचा जेम्स बाँड ठरवत ‘अजित डोवाल, नाम ही काफी है’ अशी टिप्पणी केली आहे.

ट्विटवर शुभेच्छांचा वर्षाव
बागपतचे भाजप खासदार डॉ. सत्यपाल सिंग यांनीही डोवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना देशाचा गौरव संबोधिले आहे. उत्तराखंडच्या पौडी गढवालमध्ये 20 जानेवारी 1945 रोजी अजित डोवाल यांचा जन्म झाला होता. अजमेर सैन्यशाळेतून शिक्षण घेतल्यावर त्यांनी आगरा विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले होते. 1968 च्या केरळ तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले डोवाल चार वर्षांनी म्हणजेच 1972 मध्येच इंटेलिजेन्स ब्युरोशी जोडले गेले. त्यानंतर एका मागोमाग एक अनेक महत्त्वपूर्ण गुप्त मोहिमांमध्ये त्यांनी अजोड कामगिरी फत्ते केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *