महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२. जानेवारी – देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) कोट्यवधी ग्राहकांना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका याबाबत सावधान केले आहे. असे केल्यास तुम्ही तुमच्या मेहनतीची कमाई एका फटक्यात गमावू शकता. शिवाय बँकेने इस्टंट लोन देण्याचं आमिष देणाऱ्या अप्सपासून देखील सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. बँकेने काही सेफ्टी टिप्स दिल्या आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता. बँकेने अशा अप्सना बळी न पडण्याचा सल्ला दिला आहे. हे अप्स झटपट लोन मिळवून देण्याचं सांगतात आणि ग्राहकांना लाखोंचा गंडा घालतात. या अप्समध्ये ग्राहकांची फसवणूक होते, अनेकदा झटपट लोन देण्याचं सांगत ते ग्राहकांकडून 35 टक्क्यांपर्यंत देखील व्याज उकळतात.
एसबीआयने ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, कृपया अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. SBI किंवा इतर कोणत्याही बँकेची नक्कल करणाऱ्या कंपनीला तुमची माहिती देऊ नका. तुमच्या कोणत्याही आऱ्थिक आवश्यकतांसाठी https://bank.sbi यावर जा
कृपया अप्रमाणिक लिंक पर क्लिक न करें। SBI या किसी अन्य बैंक का प्रतिरूपण करने वाली इकाई को अपना विवरण प्रदान न करें। अपनी सभी वित्तीय आवश्यकताओं के लिए https://t.co/rtjaIeXXcF पर जाएं। pic.twitter.com/Iwe23JFiNv
— State Bank of India (@TheOfficialSBI) January 20, 2021
इंस्टंट लोन देणारे अप्स प्रोसेसिंग फीच्या नावाखाली मोठी रक्कम ग्राहकांकडून उकळतात. कोरोना आणि लॉकडाऊन काळात अनेकांनी आर्थिक समस्यांमुळे कर्ज घेतलं होतं. अशाही घटना समोर आल्या होत्या की, या ग्राहकांनी 7 दिवसांच्या आतमध्ये कर्ज चुकतं केलं नाही त्यामुळे त्यांना धमकीचे फोन आले होते.
बँकेने इंस्टंट लोनच्या जाळ्यात ग्राहकांनी अडकू नये म्हणून काही टिप्स दिल्या आहेत
-कर्ज घेण्यापूर्वी नियम आणि अटी पूर्णपणे समजून घ्या
-कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका
-कोणतही अप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता तपासा
-आर्थिक आवश्यकतांसंदर्भात https://bank.sbi यावर व्हिजिट करा