महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३ जानेवारी – नव्या कृषी कायद्यासंबंधी केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये पार पडलेली चर्चेची ११ वी फेरीदेखील निष्फळ ठरली. यानंतर आता कृषी कायद्यावरील शेतकरी आणि सरकारमधील बैठका बंद झाल्या आहेत. असे बैठकीनंतर कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.
‘आम्ही शेतक-यांसोबत 12 बैठका घेतल्या. जेव्हा शेतकरी कायदे परत घेण्यावर अडून होते, तेव्हा आम्ही त्यांना अनेक पर्याय दिले. आजही आम्ही त्यांना म्हणालो, सर्व पर्यायांवर विचार करुन आपला निर्णय सांगावा. इतक्या बैठका घेऊनही निर्णय झाला नाही, याचे आम्हाला दुःख आहे.
इतक्या बैठकानंतरही तोडगा निघत नाही म्हणजे, यामागे कोणतीतरी शक्ती आहे, जे शेतक-यांचा वापर करुन आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत शेतक-यांच्या मागणीवर निर्णय होऊ शकणार नाही.’ असे तोमर म्हणाले.