महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३ जानेवारी – वर्षभरापूर्वी बजाज ऑटोने आपली पहिली इलेक्ट्रीक स्कुटर ‘चेतक’ लाँच केली होती. या गाडीचे बुकिंग आता आर्थिक वर्ष 2022 मध्ये 24 शहरात करता येणार आहे.सध्याला चेतक गाडीचे बुकिंग फक्त बेंगळूर व पुणे शहरातच खुले आहे. बॅटरी सेल्स पुरवण्यात व्यत्यय आल्याने बजाज ऑटोला इतर शहरांपर्यंत पोहचता आलेले नाही. पुरवठय़ाच्या साखळीत तफावत असल्याने चेतकबाबत कंपनीची चिंता वाढली आहे. सर्व काही सुरळीत झाल्यावरच विस्ताराचा क्रम हाती घेणे इष्ट ठरणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जूनपासून पुण्याजवळील चाकणमधील कारखान्यात चेतकचे उत्पादन घेतले जात आहे.