महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३ जानेवारी – बँक डबघाईला गेल्यावर बॅंकेत आपण ठेवलेले पैसे काढण्यावर मर्यादा येतात तसेच ठेवी रुपात ठेवलेले कष्टाचे पैसेही बुडतात असे आर्थिक फसवणूकीचे कठीण प्रसंग जनतेवर येवू नयेत म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुंतवणूकीसाठी व दैनंदिन व्यवहारासाठी खात्रीशीर विश्वासू अशा सुरक्षित बॅंकांची D-SIB (Domestic Systemically Important Banks) यादी जाहीर केली आहे ज्या मध्ये SBI. , ICICI व HDFC या तिन बॅंकांचा समावेश आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार कोरोना सारख्या कठीण काळात ही या बँकांमध्ये आर्थिक व्यवहार सुरळीत राहीलेत. एकंदरीत आर्थिक दृष्ट्या सक्षम व कर्ज परतफेडीस पात्र असणाऱ्यांनाच कर्ज पुरवठा करणाऱ्या ह्या बॅंका आहेत असा निष्कर्ष आर.बी.आय.ने जाहीर केला आहे..
.रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने विश्वासार्ह बॅंकांची यादी प्रसिद्ध करने हि बाब जनतेच्या हितासाठी स्वागतार्ह आहे…..मात्र प्रश्न असा आहे की आर्थिक व्यवहारास विश्वासार्ह बॅंका फक्त तिनच आहेत तर इतर बॅंकांच्या बाबतीत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया काय निर्णय घेणार आहे? इतर बॅंका चुकीच्या मार्गाने व्यवहार करून…डबघाईत जावून बूडणार असतील तर त्याला कोण जबाबदार असणार आहे? … कारण इतर बॅंकांचे कामकाजही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्याच अखत्यारीत असल्यामुळे सदर बॅंकावर कडक नियमावली लावून आर्थिक पत सुधारेल व व्यवहारास विश्वासार्ह होतील असे नियंत्रण ठेवले पाहिजे…अन्यथा ह्या तिनच बँकांवर कामकाजाचा बोझा वाढून बॅंकिंग क्षेत्रावर दुष्परिणाम होवून आर्थिक घडी सुधारण्या ऐवजी बिघडू शकते.विश्वासार्ह बॅंकाची यादी प्रसिद्ध करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलायला पाहत आहे. देशातील वित्तीय पुरवठा करणाऱ्या सर्व बॅंकांची नोंदणी व कामकाज व तपासणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्याच अखत्यारीत होत असतांना ठराविक बॅंकाच विश्वासास पात्र आहेत असे प्रसिद्ध करण्यापेक्षा जनतेचे पैसे बुडणार नाहीत याची हमी घ्यावी. सर्व बॅंकांच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अथवा सरकारने घ्यावी तरच जनतेचा पैसा सुरक्षित राहील व देशाची अर्थ व्यवस्था सुधारेल…….पि.के.महाजन…..जेष्ठ कर सल्लागार.