100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटांबाबत RBI ने दिली महत्त्वाची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३ जानेवारी – – 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटांबाबत भारतीय रिझर्व्ह बँक एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. जुन्या नोटा या निर्णयानंतर इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. 100, 10, 5 रुपयांच्या जुन्या नोटासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडून महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार 100, 10, 5 रुपयांच्या सर्व जुन्या नोटा या मार्च-एप्रिलनंतर चलनात नसणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी दिली आहे. तसेच सध्या या जुन्या नोटा परत मागे घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती देखील आरबीआयने दिली आहे.

याबाबत महाव्यवस्थापक बी. महेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा मार्च-एप्रिलपर्यंत चलनातून बाहेर पडतील. कारण या नोटा परत घेण्याची योजना आहे. आधीपासूनच यांच्या नवीन नोटा चलनात आल्या आहेत. 2019 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 100 रुपयांची नवीन नोट चलनात आणली होती. पण नोटाबंदीच्या वेळी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्याने गोंधळ झाला होता. यामुळे आता आरबीआय अचानक कोणतीही जुनी नोट बंद करू इच्छित नाही. तर सर्वप्रथम त्याची नवीन नोट बाजारात चलनामध्ये आणली जाईल. त्यानंतरच जुन्या नोटा चलनातून काढल्या जातील, असे आरबीआयने म्हटले आहे.

सध्या बाजारात दहा रुपयांच्या नाण्यांविषयी वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात आहेत. दहा रुपयाचे नाणे घेण्यास काही व्यापारी किंवा दुकानदार नकार देत आहेत. आरबीआयने यावर ही बँकेसाठी अडचण आहे. म्हणून अशा अफवा टाळण्यासाठी बँक वेळोवेळी सल्ला देते. तरी देखील अनेक लोक चलनामध्ये 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार देतात. यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी लोकांनी दहा रुपयांच्या नाण्यांविषयी कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नये, असे आरबीआयने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *