सोनं खरेदीचा विचार करताय ? तुमच्यासाठी चांगली बातमी सोन्याच्या दरात घसरण, पहा आजचा दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३. जानेवारी – सोनं खरेदीचा विचार तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या सोन्याच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. सोन्याच्या दरात आज घट झाली आहे.Good Returns या वेबसाइटच्या माहितीनुसार, देशात सोन्याच्या दरात आज प्रति १० ग्रॅममागे (१ तोळं) २१० रुपयांची घट झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅममागे ४८, ३४० रुपये इतका झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅममागे ४८, ५५० रुपये इतका होता.

गेल्या सहा दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत होतं. आंतरराष्ट्रीत बाजारातील सकारात्मक वातावरण आणि अमेरिकेतील सत्तांतरणामुळे सेन्सेक्सनेही भरारी घेतली होती. याचाच परिणाम सोन्याच्या दरावरही पाहायला मिळाला होता.

२४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२४ कॅरेट सोन्याच्या किमतीतही घट झाली आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति १० ग्रॅम ४९,३४० रुपये मोजावे लागणार आहेत. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे २१० रुपयांची घट झाली आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा आजचा दर
मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ४८,३४० रुपये इतका आहे. तर दिल्लीत ४८,१०० रुपयांनी सोनं खरेदी करता येऊ शकतं. पुणे आणि नाशिकमध्येही ४८,३४० रुपये इतका दर असल्याची माहिती good returns या वेबसाइटने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *