लसुणाचे सेवन आरोग्यास उपयुक्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २४ जानेवारी – लसुणाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी लाभकारी आहे हे आपण जाणताच. लठ्ठपणा असो, मधुमेह असो, किंवा सांधेदुखी असो, या सर्वच समस्यांसाठी लसुणाचे सेवन उपयुक्त आहे. त्याशिवाय इतर अनेक आजारांपासूनही, लसूण नियमित सेवन केल्याने बचाव होऊ शकतो. लसूण कच्चा खाल्ला जाऊ शकतो, किंवा नेहमीप्रमाणे भाजीच्या फोडणीमध्ये घालून खाल्ला जाऊ शकतो. आणखी एका प्रकारे लसुणाचे सेवन करता येते, ते म्हणजे भाजून. दररोज लसूणच्या दोन पाकळ्या भाजून घेऊन खाल्ल्याने त्यामुळे आरोग्य चांगले, आणि शरीर निरोगी राहते.

भाजलेल्या लसुणाचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जाते. या लसूणाच्या सेवनाने शरीरातील ‘गुड’ कोलेस्टेरोलचे प्रमाण वाढते, आणि हानिकारक कोलेस्टेरोलचे प्रमाण कमी होते. भाजलेल्या लसूणाच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे लहान मोठ्या व्याधी शरीरापासून दूर राहून शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदत होते.

भाजलेले लसूण खाल्ल्याने हाडे बळकट होतात. तसेच या लसुणाचे सेवन शरीरावर दिसून येणाऱ्या प्रौढत्वाच्या खुणा कमी करण्यास सहायक आहे. या लसूणाच्या सेवनाने शरीरातील घातक, विषारी द्रव्ये लघवीच्या वाटे बाहेर टाकली जातात. उच्चरक्तदाब असेलल्या व्यक्तींसाठी भाजलेल्या लसुणाचे सेवन उत्तम आहे. अश्या व्यक्तींनी भाजलेल्या दोन लसुणाच्या पाकळ्यांचे सेवन नियमित करावयास हवे. तसेच ज्यांना वजन घटवायचे आहे, त्यांनीही भाजलेल्या लसुणाचे सेवन करावे. यामुळे शरीराची चयापचय शक्ती सुधारून वजन घटण्यास मदत होते. गर्भवती महिलांच्या करिता देखील भाजलेल्या लसुणाचे सेवन लाभकारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *