महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २५ जानेवारी – गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत तांदळाचा हंगाम सुरू झाला असून, कोलम आणि आंबेमोहर तांदळाला चांगली मागणी असल्याचं चित्र समोर आलंय. देशातील सुरू झालेल्या तांदळाच्या हंगामातही यंदा आंबेमोहर आणि कोलम या नॉन बासमती तांदळाला बाजारपेठेत उठाव राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन्ही तांदळांच्या किमती क्विंटलला 500 रुपयांनी वधारल्यात. आफ्रिका, युरोप, अमेरिका या देशांतून दोन्ही जातींच्या तांदळाला मोठी मागणी आहे. (Good Demand For Kolam, Ambemohar Rice At The Beginning Of The Rice Season)
सध्या जिथे भात पिकवला जातो, त्या पट्ट्यांत भातापासून तांदूळ काढण्याची प्रक्रिया वेगवान झालीय. अनेक भागांत मोठ्या प्रमाणात भातापासून तांदूळ काढला जात आहे. परदेशातील वाढती मागणी पाहता दोन्ही देशांतील तांदळाला चांगली मागणी आहे. दोन्ही जातींचे भाव वाढीव राहणार असल्याचाही व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
तांदळांच्या दरात 500 रुपयांची वाढ
मध्य प्रदेशात आंबेमोहर तांदळाला चांगली मागणी आहे. राज्यांतर्गत बाजारातही या तांदळाचा दर मोठा आहे. मध्य प्रदेशात क्विंटलला जागेवर 5500 ते 6000 रुपये दर होता. यंदा हा दर वाढून 6000 ते 6500 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलाय. आंध प्रदेशात डिसेंबर 2019ला तोच दर क्विंटलला 6000 ते 6500 रुपयांच्या घरात होता. यंदा क्विंटलला 6500 ते 7000 रुपये दर मिळत आहे.