ऍमेझॉन हिंदुस्थानात सात हजार कोटींची गुंतवणूक करणार, जेफ बेझोसची घोषणा

Loading

महाराष्ट्र 24 – ऍमेझॉन ही इ कॉमर्स कंपनी हिंदुस्थानात मध्यम व लघू उद्योगात 7 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. कंपनीची सीईओ जेफ बेझोस यांनी ही घोषणा केली आहे. बेझोस सध्या हिंदुस्थान दौर्‍यावर असून एका कार्यक्रमात ते बोलत होते.

जेफ बेझोस हिंदुस्थान दौर्‍यावर आहेत. त्यांनी महात्मा गांधी यांचे स्मृतीस्थळ राजघाटावरही भेट दिली. आज लघू व मध्यम उद्योजकांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. लघू व मध्यम उद्योगाचे डिजिटलायझेशन करण्यासाठी 7 हजार कोटींची गुंतवणूक करण्याची त्यांनी घोषणा केली.

ऍमेझॉन कंपनी 2025 पर्यंत 10 हजार कोटी डॉलरचे मेक इन इंडियाच्या उत्पादने निर्यात करतील, तसेच 21 शतकात हिंदुस्थान आणि अमेरिका यांची मैत्रा फार महत्त्वाची आहे असेहे बेझोस म्हणाले. बेझोस आज सरकारी अधिकारी, उद्योगपतींशी भेटतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *