बहुप्रतिक्षित होंडा ऍक्टिवा 6 जी बाजारात दाखल झाली होंडा

Loading

महाराष्ट्र 24 – होंडा कंपनीने आपली सहावी जनरेशन होंडा एक्टिवा 6जी भारतात लाँच केली आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 63,912 रुपये आहे. 2001 मध्ये सर्वात प्रथम होंडा एक्टिवा लाँच झाली होती.

यामध्ये कंपनीने बीएस6 मानक इंजिन दिले आहे. नविन होंडा एक्टिवामध्ये कंपनीने 109सीसी इंजिन दिले आहे. बीएस6 इंजिन व्यतरिक्त यात कंपनीने इंजिनमध्ये कार्ब्युरेटरच्या जागी फ्यूल इंजेक्शन सिस्टम दिली आहे. हे इंजिन 8,000 rpm वर 7.68 bhp पावर आणि 5,250 rpm वर 8.79 Nm पीक टॉर्क जेनरेट करते.

स्टायलिंगबद्दल सांगायचे तर यात पुढील बाजूला नवीन फ्रंट ऐप्रन आणि रिवाइज्ड एलईडी हेलॅम्पसह मागील बाजूला काही बदल केले आहेत. साइड पॅनेलमध्ये देखील काही बदल पाहिला मिळतील. नवीन होंडा एक्टिवा 6जी काही प्रमाणात एक्टिवा 5जी प्रमाणेच दिसते.नवीन एक्टिवामध्ये सेमी-डिजिटल इंस्ट्रुमेंट कंसोल, रिमोट हॅच ओपिनंगसोबत मल्टी फंक्शन की असे अन्य फीचर्स आहेत. नवीन स्कूटरमध्ये सायलेंट स्टार्ट एसीजी मोटार देण्यात आली आहे.नवीन एक्टिवा 6जी स्टँडर्ड आण डिलक्स या व्हेरिएंटसह 6 रंगात उपलब्ध आहे. स्कूटरची बुकिंग सुरू झाली असून, स्कूटरची जानेवारी अखेरपर्यंत डिलिव्हरी केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *