महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २६ जानेवारी – देशात आज ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. देशावर करोनाचं संकट असलं तरी देशवासियांत मात्र उत्साह कायम आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजपथाहून आज परेड निघणार आहे. दुसरीकडे दिल्ली सीमेवर कृषी कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकरी संघटनांकडून आज ट्रॅक्टर रॅलीही काढण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजपथावर आणि राष्ट्रीय राजधानीच्या सीमांवर हजारो सशस्र सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
देशवासियों को गणतंत्र दिवस की ढेरों शुभकामनाएं। जय हिंद!
Wishing all the people of India a Happy #RepublicDay. Jai Hind!
— Narendra Modi (@narendramodi) January 26, 2021
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळीच देशवासियांना ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा सोशल मीडियावरून दिल्या आहेत