महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. २७ । पुणे । कोरोनाचा संसर्ग जसजसा कमी व्हायला सुरुवात झाली आहे तसतश्या गेल्या अनेक महिन्यांपासून बंदअसलेल्या शाळा आता अनलॉक व्हायला सुरुवात झाली आहे.पुण्यातील शाळा आता सुरु होणार आहे. गेल्या 9 ते 10 महिन्यांपासून या शाळा बंद होत्या. राज्यातील महत्त्वाच्या शहरांत आता शाळेची घंटा वाजणार आहे. (Pune School Opening Date)
पुणे शहरातील शाळा येत्या 1 फेब्रुवारीपासून उघडण्यात येणार आहेत. शासनाने घालून दिलेल्या अटी आणि नियमांनुसार कोरोनाच्या उपाययोजना करुन शाळा उघडल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या काळजीस्तव शाळांचं रोजच्या रोज सॅनिटायझिंग तसंच फिजिकल डिस्टन्सिंग इ. नियमांचं पालन केलं जाणार आहे, अशा प्रकारचा निर्णय पुणे महापालिकेने घेतलाय.
दुसरीकडे पुणे जिल्ह्यात (पुणे ग्रामीण) देखील येत्या 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरु होणार आहेत. सध्या शाळा सुरु होणार होत्या. पण प्रशासनाच्या पातळीवर त्यासंबंधी तयारी झाली नव्हती. अखेर येत्या 1 तारखेपासून पुणे ग्रामीण आणि शहर दोन्ही विभागात येत्या 1 तारखेपासून शाळा सुरु होणार आहे.