जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते 2’, सलमान चा ‘राधे’ होऊ शकते टक्कर ; ईदच्या मुहूर्तावर होणार रिलीज

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. २७ । मुंबई । बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधत जॉनने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितले आहे. सोबतच या पोस्टमध्ये तो भारताचा झेंडा फडकवताना दिसत आहे.

जॉनने सांगितल्यानुसार, त्याचा ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर म्हणजे 14 मे 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.

खरं तर हा चित्रपट मागील वर्षी 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे चित्रीकरण लांबणीवर पडले. पण आता जॉनने चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
सलमानच्या ‘राधे’सोबत होणार टक्कर ; विशेष म्हणजे दरवर्षी ईदच्या निमित्ताने अभिनेता सलमान खानचा चित्रपट प्रदर्शित होत असतो. मात्र, यावेळी सलमानच्या चित्रपटासह जॉनच्या चित्रपटाचीही ट्रीट प्रेक्षकांना मिळणार आहे. अलीकडेच सलमानने एक पोस्ट शेअर करत त्याचा बहुप्रतिक्षित राधे हा चित्रपट ईदला रिलीज करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे यंदा तिकिटबारीवर सलमान आणि जॉनच्या चित्रपटांची टक्कर बघायला मिळणार आहे.

ही आहे चित्रपटाची स्टारकास्ट
‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी करत असून जॉनसोबतच अभिनेता मनोज बाजपेयीदेखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय दिव्या खोसला कुमार, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सत्यमेव जयतेचा पुढचा भाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *