महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. २८ । नवीदिल्ली । शाॅर्ट व्हिडिआे अॅप टिकटॉकची पॅरेंट कंपनी बायडान्सने भारतातील व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. गुरुग्रामस्थित कंपनीने टिकटॉकमध्ये काम करत असलेल्या २ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काढण्याचाही निर्णय घेतला आहे. यात सेल्स टीमचे एक हजारांवर कर्मचारी आहेत.
कंपनीने या कर्मचाऱ्यांना ५ महिन्यांचे वेतन देण्याची ऑफर दिली आहे. दरम्यान, ५९ चिनी अॅप्सवरील बंदीचा भारताचा निर्णय भेदभावपूर्ण असल्याचे सांगत चीनने म्हटले आहे. हा डब्ल्यूटीआेच्या नियमांचे उल्लंघन असल्याचा दावाही चीनने केला.