कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ; राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ जानेवारी – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतल्यानंतर ठराविक कालावधीनंतर लॉकडाऊनला मुदतवाढ दिली जात, असून पुन्हा एकदा राज्य सरकारने लॉकडाउन वाढवला आहे. लॉकडाउन २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनला सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, तसे आदेश आज काढण्यात आले आहेत. लॉकडाउन २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला असून, आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टींवर सुरू राहणार आहेत. तर ज्या सेवांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्या पूर्वीप्रमाणेच बंद असणार आहेत.

लॉकडाऊन वाढवताना राज्य सरकारने यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेश लागू असतील. मिशन बिगीन अगेन अंतर्गत गेल्या ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. पण, कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *