देशात तिप्पट वेगाने बरे झाले रुग्ण ; टॉप-15 संक्रमित देशांच्या यादीतून बाहेर पडला भारत;

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. ३०। मुंबई । देशात कोरोना महामारीची सुरुवात होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशीच केरळमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत 1 कोटी 7 लाख 34 हजार लोक कोरोनाच्या विळख्यात सापडलेले आहेत. लॉकडाऊननंतर नवीन केस येण्याचा वेग 725% वाढला होता. 17 सप्टेंबरला देशात कोरोना सर्वोच्च स्तरावर होता. तेव्हा देशात 10.17 लाख अॅक्टिव्ह केस होत्या. म्हणजेच या रुग्णांवर उपचार सुरू होते. तेव्हा भारत जगातील दुसरा सर्वात जास्त संक्रमित देश होता.

यानंतर रुग्ण कमी होऊ लागले आणि ज्या वेगाने रुग्ण वाढत होते, सप्टेंबरनंतर त्याच्या तिप्पट म्हणजेच 2200% च्या वेगाने लोक बरे होऊ लागले. आता एका वर्षानंतर चांगले वृत्त म्हणजे भारत जगातील टॉप-15 संक्रमित देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. आपल्याकडे आता 1.67 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात दोन दिवसांच्या आत भारताने तीन देशांना मागे टाकत 17 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. 28 जानेवारीपर्यंत भारत 14 व्या क्रमांकावर होता.

अमेरिका, फ्रान्ससारखे देश सर्वात जास्त संक्रमित
जगातील टॉप-10 संक्रमित देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. येथे सध्या 98 लाखांपेक्षा अॅक्टिव्ह केस आहेत. दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्स आहे, जेथे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 28 लाख आहे. यूके तिसऱ्या, ब्राझील चौथ्या, बेल्जियम 5 व्या क्रमांकावर आहे. टॉप-15 संक्रमित देशांमध्ये रशिया, इटली, सर्बिया, मॅक्सिको, जर्मनी, पोलँड, स्विट्जरलैंड, यूक्रेन, पोर्तुगाल आणि इंडोनेशियाचाही समावेश आहे.

आतापर्यंत 1.04 कोटी लोक बरे झाले
शुक्रवारी देशात 13 हजार 53 नवीन रुग्ण आढळले होते. 14 हजार 872 लोक बरे झाले आणि 137 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1.07 कोटी रुग्णांमधून 1.04 कोटी लोक बरे झाले आहेत. 1 लाख 54 हजार 184 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 लाख 67 हजार 316 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *