महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१। नवीदिल्ली। जगभरात थैमान घातलेल्या कोरोना साथीमुळं (Corona Pandemic) 2020 हे खूप कठीण वर्ष गेलं. आता 2021 मध्ये आर्थिक परिस्थिती पुन्हा सुरळीत होईल आणि हळूहळू परीस्थिती सामान्य होईल, अशी सर्वांना आशा आहे. 2021च्या अर्थसंकल्पात (Budget 2021) आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण काय घोषणा करतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.