ऍलोपथी, आयुर्वेद मिळून औषधाची निर्मिती ; मधुमेह नियंत्रित राहण्यासह हृदयाशी संबंधित आजारांची धोकाही कमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३१ जानेवारी – कोरोना महामारीत मधुमेहाला नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली एम्समध्ये पहिल्यांदाच ऍलोपथी आणि आयुर्वेदचे औषध तयार करण्यात आले आहे. दोन्ही औषधे आयुर्वेदिक औषध बीजीआर-34 आणि ऍलोपेथिक औषध ग्लिनबेनक्लामीड यांना एकत्र आणून तयार करण्यात आले आहे. नव्या औषधाने मधुमेह नियंत्रित राहण्यासह हृदयाशी संबंधित आजारांची धोकाही कमी होणार आहे.

दुप्पट प्रभाव

या औषधावर अध्ययन करण्यात आले असून परीक्षणात हे औषध रक्तवाहिन्यांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल साचू देत नाही तसेच स्थुलत्व कमी करत असल्याचे दिसून आले आहे. बीजीआर-34 आणि ग्लिबेनक्लामीड यांचे पहिल्यांदाच स्वतंत्रपणे तर नंतर एकत्रित परीक्षण करण्यात आले आहे. दोन्ही परीक्षणांच्या निष्कर्षांची तुलना केल्यास एकत्रित औषधांचा वापर दुप्पट दिसून आला आहे. नव्या औषधाने इन्सुलिनच्या पातळीला अत्यंत वेगाने बळ मिळते आणि लेप्टिन हार्मोनचा स्तरही कमी होऊ लागतो असे दिल्ली एम्सच्या फार्माकोलॉजी विभागाकडून म्हटले गेले आहे.

आजारांचा प्रभाव घटतो

फार्माकोलॉजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुधीर चंद्र सारंगी यांच्या देखरेखीत होत असलेले हे अध्ययन मार्च 2019 पासूनच तीन टप्प्यांमध्ये केले जात आहे. पहिल्या टप्प्यात प्री-क्लीनिकल ट्रायलच्या अंतरिम परिणामांमध्ये हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. इन्सुलिनची पातळी वाढल्याने मधुमेह नियंत्रित होऊ लागतो, तर लेप्टिन हार्मोन कमी झाल्याने स्थुलत्व आणि मेटाबॉलिज्मशी संबंधित नकारात्मक प्रभाव कमी होतात. तसेच याच्या वापराद्वारे कोलेस्ट्रॉलमध्ये ट्रायग्लिसराइड आणि व्हीएलडीएलची पातळीही कमी होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. याचा अर्थ मधुमेहग्रस्तांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी होतो.

मधुमेहविरोधी क्षमता

बीजीआर-34 च्या मधुमेहविरोधी क्षमतेचा शोध लावण्यासाठी एम्सच्या डॉक्टरांनी हे अध्ययन केले आहे. या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती लखनौच्या सेंटल इन्स्टीटय़ूट ऑफ मेडिसीनल अँड एरोमॅटिक प्लँट्स आणि नॅशनल बॉटेनिकल रिसर्च इन्स्टीटय़ूटच्या वैज्ञानिकांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *