भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय )धोनीला केंद्रीय करारातून वगळलं.

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीला मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय )धोनीला केंद्रीय करारातून वगळलं आहे. बीसीसीआय़ने आज जाहीर केलेल्या कराराच्या यादीत धोनीचे नाव नाही. वर्ल्ड कपनंतर संघातून बाहेर असलेल्या धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा यामुळे पुन्हा होत आहेत. आता बीसीसीआय़च्या या निर्णयाने धोनी पुन्हा भारतीय क्रिकेट संघात दिसणं कठिण होणार आहे. धोनीला क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या कोणत्याच यादीत स्थान दिलेलं नाही.

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. एवढेच नाही तर धोनीनं घरेलू मालिकांमध्येही भाग घेतला नाही. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार की नाही याबाबत शंका असताना, जानेवारीपर्यंत निवृत्तीबाबत विचारू नका, असे संकेत धोनीनं दिले होते.

‘वनडे क्रिकेटमधून धोनी घेऊ शकतो निवृत्ती’भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही धोनी (महेंद्रसिंग धोनी) लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल असे संकेत दिले होते. रवी शास्त्री यांना धोनीच्या निवृत्तीबाबत विचारले असता, “धोनी बर्‍याच दिवसांपासून तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळत होता. त्यानंतर तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आणि आता तो एकदिवसीय क्रिकेटदेखील सोडू शकतो. यानंतर या वयात त्याला फक्त टी -20 क्रिकेट खेळायला आवडेल. यासाठी त्यांना पुन्हा खेळायला सुरुवात करावी लागेल”, असे सांगितले होते.

टी -20 वर्ल्ड कप खेळणार धोनी! रवी शास्त्री यांनी यावेळी धोनी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकतो असे संकेत दिले आहेत. जुलै 2019 पासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसला तरी निवृत्तीबाबत थेट बोलला नाही आबे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियामधील त्याचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. इंडियन प्रीमियर लीगमधील त्याचे खेळणे हादेखील वर्ल्ड कपच्या तयारीचा एक भाग मानला जात आहे. तथापि, त्याआधी धोनी न्यूझीलंड दौऱ्या साठी निवडलेल्या भारतीय संघात स्थान मिळवू शकेल काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *