डॉ. पाईल्स क्लिनिकतर्फे सुश्रुत पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

Loading

 

विविध मान्यवरांच्या उपस्थित पार पडणार दिमाखदार सोहळा

*महाराष्ट्र 24 । पुणे ।* डॉ. पाईल्स क्लिनिकतर्फे सुश्रुत पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. 26 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता कोंढवा-कात्रज रस्त्यावरील इस्कॉन टेम्पल येथे होणार आहे. डॉ. के. के. सिजोरिया (ग्वाल्हेर), डॉ. महेश संघवी (मुंबई), डॉ. नंदकिशोर बोरसे (पुणे), वैद्य अश्वीन बरोत (लंडन) यांना जीवन गौरव सुश्रुत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर डॉ. रमेश घोडके (बीड), डॉ. हेमंत इंगळे (नांदेड), डॉ. राजेंद्र झोल (औरंगाबाद) यांना सुश्रुत रत्न्ा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सर्वाधिक संख्येने उपस्थित राहणार्‍या मूळव्याधग्रस्त रुग्णांच्या मेळाव्याची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होणार असल्याची माहिती मूळव्याध तज्ज्ञ डॉ. कुणाल कामठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच जास्तीत जास्त मूळव्याधग्रस्त रुग्णांनी या सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

या पुरस्कार सोहळ्यास डॉ. आलोक गुप्ता (यवतमाळ), डॉ. भरत ओझा (पुणे) यांना एक्स्ट्रॉऑर्डिनरी वर्क इन प्रोक्टोलॉजी या पुरस्काराने तर डॉ. सुर्यकिरण वाघ (कोल्हापूर), डॉ. वीणा देव (नागपूर), डॉ. हरीष पाटणकर (पुणे) यांना आयुर्वेद आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. इस्कॉनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णनामदास महाराज तसेच डॉ. कालिदास चव्हाण, खासदार अमर साबळे, महापौर मुरलीधर मोहोळ, डॉ. शिवकुमार गोरे, डॉ. मिलींद भोई, योगेश टिळेकर, चेतन तुपे, डॉ. चंद्रकांत कोलते, डॉ. संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *