महाराष्ट्र 24 पुणे – पुण्यातील नंदादीप प्रतिष्ठान कडून सातारातील अपशिंगे मिल्ट्री गावाला मानपत्र. ब्रिटिश काळापासून अपशिंगे मिल्ट्री या गावाला सैनिकांचा वारसा आहे. या गावातून दुसरे महायुद्ध असो, भारत चीन युद्ध असो, भारत पाकिस्तान युद्ध असो या प्रत्येक युद्धात लढलेल्या तसेच शहिद झालेल्या सैनिकांचा वारसा आहे. या गावातील सर्वच घरातून एक तरी व्यक्ती भारतीय सैन्यात सेवा करीत आहे. त्यामुळे या गावाचे नावच अपशिंगे मिल्ट्री ठेवले गेले आहे.
या गोष्टीचा आदर आणि अभिमान बाळगून पुण्यातील नंदादीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नीता ढमाले यांनी भारतीय सैन्यातील सेवेचा वारसा जोपासणाऱ्या अपशिंगे मिल्ट्री या गावाला मानपत्र दिले . तसेच देशाप्रती त्यांनी केलेल्या त्यागामुळे एक कर्तव्य भावना म्हणून अपशिंगे गावातील जिल्हा परिषद शाळेतील गरज ओळखून ४०० विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय होईल असे जल शुद्धीकरण पंप शाळेत बसवून दिला,आणि टेलिफोन असे जिल्हा परिषद शाळेला दिलाअसल्याचे नंदादीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. नीता ढमाले यांच्याकडून समजले आहे. याच बरोबर ग्राम पंचायत कार्यालयाला ध्वनिक्षेपक देखील देण्यात आला.
अपशिंगे गावाला मानपत्र तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जलशुद्धीकरण संचाचे उद्घाटन प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारी २०२० ला नंदादीप प्रतिष्ठानच्या सौ नीता ढमाले यांच्या हस्ते झाले. तसेच इनर व्हील क्लब ने देखील मदतीत खारीचा वाटा उचलला व ह्या सोहळ्यास इनर व्हील क्लब च्या मा.अध्यक्षा मनीषा समर्थ, सेक्रेटरी वैशाली जैन, व्हाईस प्रेसिडेंट वैशाली शहा ह्या उपस्थित होत्या.