महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १ – निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आपल्या जुन्या कारची वैधता किती दिवसांची राहिल किंवा आपली जुनी कार किती वर्षांपर्यंत वापरायची यासंदर्भातही माहिती दिली. जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये जातील, त्यामुळे प्रदूषण नियंत्रणात येईल. तेल आयात बिलातही कमी होणार असून ऑटोमेटेड फिटनेस सेंटर उभारण्यात येणार आहेत. आपल्या खासगी गाड्यांना 20 वर्षांच्या वापरानंतर या सेंटरमध्ये जावे लागणार आहे.
खासगी वाहनांना 20 वर्षांनी तर व्यावसायिक वाहनांना 15 वर्षांनी ऑटोमेटेड सेंटरमध्ये दाखल करावे लागणार आहे. जुन्या गाड्यांना रसत्यावरुन हटविणे हाच या निर्णयाचा उद्देश असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीवर काम सुरू होते, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण, 15 वर्षांच्या जुन्या गाड्यांमुळे प्रदुषण वाढते आणि त्यांची रिसेल किंमतही अतिशय कमी असते. या पॉलिसीला रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवे मिनिस्ट्रीने मंजुरी दिली असल्यामुळे एप्रिल 2022 पासून जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये जाणार आहेत. 2030 पर्यंत देश पूर्णपणे ई-मोबॅलिटी करण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे. यातून देशात कच्च्या तेलाच्या आयात बिलात कमतरता आणणे हा आहे.
या वस्तु होणार स्वस्त
स्टील आणि लोखंडी वस्तूंच्या किमती कमी होणार
सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात घट, त्यामुळे सोने आणि चांदी आणखी स्वस्त होणार
तांब्याच्या वस्तू
चामड्यापासून बनवलेल्या वस्तू
या वस्तु होणार महाग
मोबाइलच्या काही पार्ट्सवर कर वाढविण्यात आल्याने मोबाइलच्या किंमती होणार वाढ
परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुट्या भागांवरील कर वाढविण्यात आल्यामुळे वाहनांच्या किमतीत होणार वाढ
परदेशातून आयात केले जाणारे कपडे
कॉटनचे कपड्यांच्या किंमतीत होणार वाढ