शेतकरी आंदोलन ; ​​​​​​​हरियाणात आज शेतकरी महापंचायत होणार, 50 हजार लोक येण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.३। नवीदिल्ली । कृषी कायद्याच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाचा आज 70 वा दिवस आहे. आंदोलन मजबूत करण्यासाठी शेतकरी सातत्याने दिल्लीमध्ये पोहोचत आहेत. तर हरियाणाच्या जींद जिल्ह्याच्या कंडेला गावात आज शेतकरी महापंचायत बोलावण्यात आली आहे. यामध्ये 50 हजार लोक जमा होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे, गाजीपूर सीमेवर आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते राकेश टिकैतही जींदच्या महापंचायतीत सहभागी होतील. तत्पूर्वी टिकैत मंगळवारी म्हणाले की, ‘आम्ही सरकारला ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. जर तसे झाले नाही तर देशभरात ट्रॅक्टर रॅली काढली जाईल, यात 40 लाख ट्रॅक्टरचा सहभाग असण्याची शक्यता आहे. दरम्यान, आंदोलनही सुरूच राहणार आहे.

दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यान 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारानंतर ज्यांना सापडलेल जे लोक सापडले नाहीत किंवा ज्यांना अटक झाली आहे त्यांना मदत करण्यासाठी संयुक्त मोर्चाने एक कायदेशीर पथक तयार केले आहे. टीमच्या सदस्यांनी सांगितले की, ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट त्यांनी घेतली होती. तिथून त्यांना माहिती मिळाली की तिहार तुरूंगात 115 लोक बंद आहेत. कॉंग्रेसच्या कायदेशीर कक्षाने हिंसाचार प्रकरणात शेतकऱ्यांना मदत करण्याची ऑफर दिली आहे. कॉंग्रेसने म्हटले आहे की कायदेशीर पथक शेतकरी नेत्यांना भेटेल.

शेतकरी संघटनांनी मंगळवारी जाहीर केले आहे की 6 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय व राज्य महामार्ग रोखले जातील. भारतीय किसान मोर्चाचे नेते बलबीरसिंग राजेवाल म्हणाले की, शनिवारी दुपारी 12 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राष्ट्रीय व राज्य महामार्ग रोखण्यात येणार आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांची तयारी पाहता पोलिसही बॅरिकेडिंग मजबूत करत आहेत. टीकरी बॉर्डरवर मंगळवारी पहिले 4 फूट जाड सीमेंटची भिंत उभारुन 4 लेअरमध्ये बॅरिकेडिंग करण्यात आली. यानंतर रस्ता खोदून त्यामध्ये खिळे बसवण्यात आले. रस्त्यावर रोडरोलरही उभे करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *