न्यूझीलंड विश्व कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.३। मुंबई । ऑस्ट्रेलियाने कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे आपला दक्षिण आफ्रिका दौरा लांबणीवर टाकल्यानंतर उद्घाटनाच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला. ऑस्ट्रेलियाने आफ्रिका दौरा लांबणीवर टाकल्याने न्यूझीलंडची 70 टक्के गुणवारी कोणीही मागे टाकू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आणि त्याचवेळी ते अंतिम फेरीत पोहोचल्याचेही निश्चित झाले. न्यूझीलंडचा प्रतिस्पर्धी भारत असेल की इंग्लंड, हे उभय संघातील शुक्रवारपासून खेळवल्या जाणाऱया मालिकेनंतर निश्चित होणार आहे.‘चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंड अंतिम फेरीत खेळेल. न्यूझीलंडचा प्रतिस्पर्धी कोण असेल, हे भारत-इंग्लंड मालिकेत निश्चित होईल’, असे ट्वीट करत आयसीसीने या वृत्ताला दुजोरा दिला.

गुणतालिकेत सध्या भारताच्या खात्यावर सर्वाधिक 71.7 टक्के गुणवारी आहे. न्यूझीलंडच्या खात्यावर 70 तर ऑस्ट्रेलिया 69.3 टक्के गुणवारीसह तिसऱया स्थानी आहे. इंग्लंडचा संघ 65.2 टक्के गुणवारीसह चौथ्या स्थानी आहे.

गुणांची टक्केवारी प्रत्येक संघाने मिळवलेल्या विजयाच्या प्रमाणात निश्चित केली जाते. भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित करायचे असेल तर मालिकेत किमान दोन सामने जिंकावे लागतील. त्याचप्रमाणे हे समीकरण उलथवून टाकण्यासाठी इंग्लंडला किमान 3 सामने जिंकत मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करावे लागेल. दोन्ही संघांना यात यश आले नाही व बरोबरी राहिली तर ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहोचण्याची संधी निर्माण होईल. या कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम लढत दि. 18 जूनपासून लॉर्डस्वर खेळवली जाणार आहे.

जागतिक कसोटी मालिकेची गुणतालिका

संघ / मालिका / मालिकाविजय /सामने / विजय / पराभव / अनिर्णीत / गुण / बळी-धावा प्रमाण

भारत / 5 / 4 / 13 / 9 / 3 / 1 / 430 / 1.619

न्यूझीलंड / 5 / 3 / 11 / 7 / 4 / 0 / 420 / 1.281

ऑस्ट्रेलिया / 4 / 2 / 14 / 8 / 4 / 2 / 332 / 1.392

इंग्लंड / 5 / 4 / 17 / 10 / 4 / 3 / 412 / 1.251

द. आफ्रिका / 4 / 1 / 10 / 3 / 7 / 0 / 144 / 0.677

पाकिस्तान / 6 / 2 / 11 / 3 / 5 / 3 / 226 / 0.785

श्रीलंका / 4 / 0 / 8 / 1 / 6 / 1 / 80 / 0.586

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *