महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.३। मुंबई । – पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या विधानावरुन आता भाजपा नेते चांगलेच संतापले आहेत. शरजीलने केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. त्यानंतर, आता आमदार नितेश राणे यांनीही शरजीलला दाखवून देऊ, असा इशारा दिलाय.
शरजील नावाच्या कारट्या ला अटक किवा चौकशी होणार नसेल तर त्याला आमच्याकडे सोपवा..
परत कधी हिंदू ना सडका म्हणणार नाही याची जबाबदारी आमची..
एल्गार काय असतो दाखवुन देऊ!!— nitesh rane (@NiteshNRane) February 2, 2021
‘आज का हिन्दू समाज, हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है। ये जो लोग लिंचिंग करते हैं, कत्ल करते है, ये कत्ल करने के बाद अपने घर जाते है तो क्या करते होंगे अपने साथ? कोई नए तरीके से हात धोते होंगे, कुछ दवा मिलाकर नहाते होंगे। क्या करते है ये लोग की वापस आकर हमारे बीच खाना खाते है, उठते-बैठते है, फिल्में देखते है। अगले दिन फिर किसीको पकड़ते है फिर कत्ल करते और नॉर्मल लाईफ जीते है। अपने घर में मोहब्बत भी कर रहे है, अपने बाप का पैर भी छू रहे है, मंदिर में पूजा भी कर रहे है, फिर बाहर आकर यही करते है…’, असे वक्तव्य एल्गार परिषदेतील भाषणात शरगीलने केले होते. त्यानंतर, भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. नितेश राणे यांनी ट्विट करुन, शरजील या कारट्याला आमच्याकडे सोपवा, एल्गार काय असतो ते दाखवून देऊ, असा दमच भरलाय.
वक्तव्य तपासल्यानंतरच कारवाई – गृहमंत्री
पुण्यातील एल्गार परिषदेत काही आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले किंवा नाही याबाबतचा व्हिडीओ मागविण्यात आला आहे. आक्षेपार्ह वक्तव्य तपासले जात आहे. त्यानंतरच पुढची कारवाई केली जाईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. त्या कार्यक्रमातील भाषणाचा व्हिडीओ मागविला आहे. त्याची रीतसर तपासणी करू. त्यानंतर काही आक्षेपार्ह आढळले तर कारवाई करू, असे देशमुख यांनी सांगितले.