health minister Rajesh Tope; ‘राज्यात महिलांसाठी अत्याधुनिक फिरता दवाखाना सुरू करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३ – मुंबई – नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून लवकरच मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. (we will start sophisticated and up-to-date a mobile clinic for women in state says state health minister Rajesh Tope) ते राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार उपक्रमासाठी आले असता बोलत होते.

महिलांना घरातून हॉस्पिटलमध्ये आणणे. विशेषतः गरोदर महिलांना त्यांच्या घरी सुरक्षित सोडणे यासाठी ही सुविधा असणार आहे. या फिरत्या दवाखान्यात टेस्टींग, लॅब, ८१ प्रकारची औषधे, ४० प्रकारच्या टेस्ट, सोनोग्राफी व महिलांचे बाळंतपण केले जाऊ शकते.

ग्रामीण भागातील प्रत्येक जिल्ह्याला दोन-दोन फिरते दवाखाने असणार आहे. ग्रामीण भागासह मुंबईमध्येही फिरत्या दवाखान्यांच्या संख्येत अधिक वाढ केली जाणार असून याचा चांगला परिणाम होईल असेही टोपे म्हणाले. या फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या किंवा रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल अशीही माहितीही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *