महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.४। मुंबई । केरळमध्ये नवी रुग्ण मिळणे अद्यापही कमी झालेले नाही. येथे जवळपास पाच महिन्यांपासून दररोज 5-6 हजार केस येत आहेत. बुधवारी येथे 6,356 संक्रमित समोर आले. 6,380 रुग्ण बरे झाले आहेत आणि 20 जणांनी जीव गमावला आहे. नवीन रुग्ण आणि एकूण अॅक्टिव्ह केसच्या प्रकरणात हे देशात टॉपवर आहे.
केरळमध्ये 69,125 तर महाराष्ट्रात 37,516 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात सध्या 1.52 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण अॅक्टिव्ह केसमध्ये 1.06 लाख, म्हणजेच जवळपास 70% केरळ आणि महाराष्ट्रातच आहे.गेल्या 24 तासांमध्ये देशात 12,916 नवीन केस आल्या, 17,808 बरे झाले आणि 107 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 1.07 कोटी लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 1.04 कोटी बरे झाले आहेत. तर 1.57 लाख लोकांनी जीव गमावला आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात बुधवारी 2992 लोक कोरोना संक्रमित आढळले. 7030 लोक रिकव्हर झाले आणि 30 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 20 लाख 33 हजार 266 लोकांना संक्रमण झाले आहे. यामध्ये 19 लाख 43 हजार 335 लोक बरे झाले आहेत. तर 51 हजार 169 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 37 हजार 516 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.