निवृत्तीसाठी असं करा प्लॅनिंग; पीपीएफ; वर्षाला 25000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील पूर्ण 38 लाख,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. ४ – सध्याच्या जगात गुंतवणूक करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public provident fund) हा एक उत्तम पर्याय आहे. ही एक दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीची योजना आहे.यामध्ये सरकार ग्राहकांना भक्कम व्याज दर देते. या योजनेचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे EEE (Exempt-Exempt-Exemp) कॅटेगरीमध्ये येते. म्हणजेच गुंतवणूकीवर डिडक्शनचाही फायदा ग्राहकांना मिळतो.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉलिसी मॅच्यूअर झाल्यानंतर पीपीएफ कॉर्पस पूर्णपणे कर-मुक्त असतो. याचा अर्थ असा की मिळालेल्या व्याजावर त्याला कोणताही कर भरावा लागत नाही.सेवानिवृत्त झाल्यानंतर पीपीएफ हा एक चांगला पर्याय आहे. पीपीएफ कॅल्क्युलेटरच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्याने वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी 25000 रुपये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर निवृत्तीनंतर (60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर) त्याला सुमारे 38 लाख रुपये मिळतात. तेसुध्या पूर्णपणे करमुक्त असतात.

खरंतर, पीपीएफसाठी लॉक-इन कालावधी ही 15 वर्षे आहे. जर एखाद्या खातेधारकास वेळेआधीच बंद करायती असेल तर 6 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तो जेवढे जमा पैसे आहेत ते काढू शकतो.PPF वर मिळणार कर नफा- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही EEE प्रकारात येते. यामध्ये गुंतवणूक आणि व्याज उत्पन्न हे दोन्ही करमुक्त असतं. यामध्ये आर्थिक वर्षात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 150000 रुपये गुंतवले जातात.तुम्हीही यामध्ये गुंतवणूक केल्यास आयकर कलम 80 सी अंतर्गत कपातीचा लाभ मिळेल. यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये जाऊन खातं उघडू शकतो.

PPF मिळते 7.1 टक्के वार्षिक व्याज – PPF खात्यावर सरकार वार्षिक 7.1 टक्के व्याज देत आहे. यात दोन प्रकारे गुंतवणूक केली जाऊ शकते. पेमेंट रोख, चेक, ऑनलाइन, ड्राफ्ट कोणत्याही प्रकारे करता येतात. खातेदार स्वत: साठीदेखील नामनिर्देशित व्यक्तीची निवड करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *