महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.५। मुंबई । इंजिनीयरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘गेट 2021’ ही परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत ही परीक्षा होणार आहे. पवई येथील आयआयटी मुंबईच्या वतीने ही परीक्षा घेतली जाणार असून त्याची माहिती er gate.iiedtb.aced.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
आयआयटी मुंबईच्या आयोजन समितीने गेट परीक्षेच्या सूचना जाहीर केल्या आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी याबाबतही माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा पेंद्रांमध्ये प्रवेश देण्यापूर्वी त्यांची टेम्परेचर तपासणी केली जाणार आहे. प्रत्येकाला मास्क घालणे आणि स्वतःचे सॅनिटायझर जवळ बाळगणे अनिवार्य आहे. सुमारे 9 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत.