कर्णधार जो रुटचे शानदार शतक ; इंग्लंडची दमदार सुरवात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी -चेन्नई – दि. ५ – टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीतील तिसर्‍या सत्राचा खेळाला सुरुवात झाली आहे. इंग्लंडने २50 धावांचा टप्पा ओलंडला आहे. कर्णधार जो रूटचा शानदार फॉर्म भारताविरुद्धही कायम आहे. तसेच रुट आणि डोमिनिक सिबले ही जोडी शतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे ही जोडी तोडण्याचे आव्हान टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर आहे. (india vs england 2021 1st test day 1 live cricket score updates online in marathi at m a chidambaram stadium chennai)

कर्णधार जो रुटचे शानदार शतक
इंग्लंडचा कर्णधार जो रुटने आपल्या 100 व्या सामन्यात शानदार शतक लगावले आहेत. रुटच्या कसोटी कारकिर्दीतील हे 20 वं शतक ठरलं आहे. इंग्लंडचा संघ अडचणीत असताना निर्णायक क्षणी त्याने डोमिनिक सिबलेसह महत्वपूर्ण भागीदारी केली.

कर्णधार जो रुट आणि डोमिनिक सिबलेची शतकी भागीदारी
कर्णधार जो रुट आणि डोमिनिक सिबले या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. इंग्लंडची 2 बाद 63 अशी स्थिती झाली होती. यानंतर या दोघांनी इंग्लंडचा डाव सावरला. या शतकी भागीदारीदरम्यान दोघांनी अर्धशतक लगावलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करावा लागत आहे.

दुसऱ्या सत्रावर इंग्लंडने वर्चस्व मिळवलं आहे. इंग्लंडने 2 विकेट गमावून २५० धावा केल्या. जो रुट ११७ धावांवर नाबाद खेळत आहे. तर सिबले८५ धावांवर आहे.इंग्लंडचा सलामीवीर डोमिनिक सिबलेने झुंजार अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच डोमिनिक आणि जो रुट या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *