या परीक्षेसाठी विमान उड्डाणेही केली जातात बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.८ । द.कोरिया, । द. कोरियात दरवर्षी नोव्हेंबर मध्ये होणारी विद्यापीठ प्रवेश परीक्षा अनेक अर्थाने महत्वाची मानली जाते. सुंगयुन या नावाने हि परीक्षा ओळखली जाते आणि सलग आठ तास हि परीक्षा चालते. या महत्वाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणताही डिस्टर्ब होऊ नये म्हणून या दिवशी बँक्स, बाजार, दुकाने बंद ठेवली जातातच पण बांधकामेहि बंद ठेवली जातात. विमान उड्डाणे होत नाहीत, मिलिटरी प्रशिक्षण बंद केले जाते तर शेअर बाजार उशिरा सुरु होतात.

या परीक्षेला विद्यार्थी वेळेवर पोहोचावेत म्हणून रस्ते मोकळे ठेवण्यासाठी पोलीस गाड्या सायरन वाजवीत रस्त्यातून फिरतात तर विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनाही इतका ताण येतो कि ते बुध्द मंदिरे अथवा चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करतात. यंदा या परीक्षेच्या काळात पंतप्रधान मून जे इन सिंगापूर मध्ये आहेत. त्यांनी तेथूनच सर्व विद्यार्थी वर्गाला फेसबुक वरून बेस्ट ऑफ लक दिले आहे.

या एका दिवसाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी १२ वर्षे मेहनत घेतात. दरवर्षी या परीक्षेसाठी ५०० शिक्षक निवडले जातात. त्याचा बाहेरच्या जगाशी संपर्क बंद केला जातो, इतकेच नाही तर त्यांना प्रशिक्षण सुरु असताना सुट्टी मिळत नाही आणि कुटुंबियांशी संपर्क करता येत नाही. येथे विद्यापीठात प्रवेश फार अवघड असून अनेक विद्यार्थी ४-५ वेळाही हि परीक्षा देतात असे समजते. शिक्षण पूर्ण झाल्यावरही नोकरीची खात्री नाही असेही सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *