महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.९ । नवीदिल्ली ।प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली आहे. (Deep Sidhu an accused in 26th January violence case arrested) प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला होता. शेतकरी आंदोलनात काही घुसखोऱ्यांनी निशान साहिब यांचा झेडा फडकवला. यात लाल किल्ल्यावर हिंसाचार केल्याप्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचे नाव समोर आले होते.
शेतकरी आंदोलना दरम्यान ट्रॅक्टर रॅलीवेळी लाल किल्ल्यावर झेंडा फडकवल्या प्रकरणी दीप सिद्धूवर गुन्हा नोंद करण्यात आला. या आरोपानंतर दीप सिद्धू फरार झाला होता. यासाठी दिल्ली पोलिसांना तब्बल १ लाखाचे बक्षिस ठेवले होते.दरम्यान, फरार झाल्यानंतरही सिद्धू फेसबुकच्या माध्यमातून व्हिडिओ मेसेज पोस्ट करत होता. एका व्हिडिओ मेसेजमध्ये त्याने आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता. तर दिल्ली पोलिसांनी याआधी सांगितले होते की तो आपल्या जवळच्या मित्राच्या मदतीने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत आहे.गेल्या आठवड्यात पोलिसांनी दीप सिद्धू, जुगराज सिंह, गुरजोत सिंग आणि गुरजंत सिंग यांच्याविषयी माहिती देणाऱ्यांना १ लाख रुपयांच्या रोख बक्षिसाची घोषणा केली होती. तर जजबीर सिंग, बूटा सिंग, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंग यांची माहिती देण्यासाठी ५० हजार रुपयांचे बक्षिस ठेवले होते.
दीप सिद्धूचा जन्म पंजाबच्या (punjab) मुक्तसर या गावात झाला. तो मॉडेल आणि अभिनेता आहे. तो कायदेशीर सल्लागार (legal advisor) म्हणून ही ओळखला जातो. दीपने २०१९ साली राजकारणात प्रवेश करत भाजप नेते सनी देओलसोबत गुरुदासपूर भागातून प्रचार केला होता. ज्यावेळी शेतकरी आंदोलन सुरू झाले त्यावेळी दीप सिद्धू या आंदोलनात सहभागी झाला होता. यावेळी काही शेतकरी नेत्यांनी दीपवर आक्षेप घेतला. परंतु, दीपने आक्षेपांना विरोध करत आपण शेतकऱ्यांसोबत आहोत असे सांगितले.