महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – चेन्नई – दि. ११ – इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी निवड करताना पाच खेळाडूंना दुखापतीमुळे (Injured) वगळावे लागले आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जाणाऱ्या भारतीय संघासमोरील अडचणी वाढल्या आहेत. पाच खेळाडू अनफीट असल्याने संघनिवडीसाठी जास्त पर्याय नसल्याचे समार आले आहे. (Five players unfit)
पहिल्या दोन सामन्यांसाठी लोकेश राहुलची निवड करण्यात आली हाती. मात्र, तो अजूनही फीट नाही. त्यामुळे तो खेळू शकणार नाही. त्याच्याबरोबर रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, उमेश यादव आणि मोहम्मद शमी हे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकत नाहीत.