पेट्रोल, डिझेल सर्वोच्च पातळीवर ; सलग चौथ्या दिवशी इंधनदरवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१२ । मुंबई। जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सलग चौथ्या दिवशी वाढ करण्यात आली आहे. नवीन दरानुसार मुंबईत पेट्रोल ९५ रुपयांजवळ पोहोचले असून, राजधानी दिल्लीत पेट्रोल दर सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. (petrol and diesel price hike again today)

तेल उत्पादक देशांनी पुरवठा कमी केल्याने गेल्या आठवडाभरापासून तेलाच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली आहे. सन २०२१ मध्ये पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आतापर्यंत १६ वेळा वाढ केली आहे. सलग चौथ्या दिवशी लीटरमागे पेट्रोल दरात २९ पैसे आणि डिझेल दरात ३८ पैसे वाढ करण्यात आली आहे. (Petrol-Diesel Rate Today)

गेल्या १० महिन्यात पेट्रोलमध्ये १८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेल १५ रुपयांनी महागले आहे. इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचा आढावा घेतला जाऊन पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली जाते.

दरवाढीनंतर आज मुंबईत लीटरमागे पेट्रोलचा दर ९४.६४ रुपये झाला आहे. तर एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८५.३२ रुपये मोजावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोलने सर्वोच्च पातळी गाठली असून, लीटरचा दर ८८.१४ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७८.३८ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९०.४४ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८३.५२ रुपये भाव आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर ८९.४४ रुपये झाले आहे. डिझेलचा दर ८१.९६ रुपये झाला आहे.

सन २०२१ मध्ये पेट्रोलच्या दरात ४.२४ आणि डिझेलच्या दरात ४.१५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसेदत दरवाढीचे सर्मथन केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे पेट्रोलियम कंपन्यांकडून होणाऱ्या दरवाढीवर केंद्र सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. तसेच सरकार हस्तक्षेप करत नसल्यामळे सामान्य नागरिकांमध्येही संतापाची लाट असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना संकटामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना इंधन दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे आता महागाईचा भडकाही उडेल,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *