महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – लंडन – दि. १२ – भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दणदणीत विजय मिळवला. ४ सामन्यांच्या मालिकेतील आता तीन सामने शिल्लक आहेत. या मालिकेनंतर भारत-इंग्लंड यांच्यात पाच टी-२० सामने आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार आहे. यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात १६ खेळाडूंची निवड करण्यात आली असून या मालिकेतील सर्वच्या सर्व सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहेत.
इंग्लंडचा टी-२० संघ- इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपली, मार्क वूड
असा असेल टी-२० मालिकेचा कार्यक्रम
१२ मार्च – पहिला टी-२० सामना
१४ मार्च – दुसरा टी-२० सामना
१६ मार्च – तिसरा टी-२० सामना
१८ मार्च – चौथा टी-२० सामना
२० मार्च – पाचवा टी-२० सामना
टी-२० मालिकेनंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २३ ते २८ मार्च दरम्यान रंगणार आहे. हे सर्व सामने पुण्याच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ काही दिवसांनी जाहीर करण्यात येणार आहे.