महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१३ । नवीदिल्ली । एप्रीलपासून तुमच्या बँकांमधील फिक्स्ड डिपॉझिटि(FD) वर जास्त व्याज मिळू शकते. जर तुम्ही बँकेतून कर्ज घेत असाल तर तुम्हाला जास्त व्याज भरावे लागू शकते. कारण भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)दर वाढवण्याची योजना आखत आहे. RBI ने व्याज वाढवल्यानंतर बँक डिपॉझिट आणि लोन दोन्हीवरील व्याज दर वाढवतील. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी दर वाढवण्यात येणार आहे.
विश्लेषकांच्या मते, महागाई नियंत्रणात न आल्यास आरबीआय दर वाढवू शकते. नवीन आर्थिक वर्षाची पहिली बैठक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. गेल्या दोन तिमाहींमध्ये महागाईचा दर आरबीआयच्या लक्ष्यापेक्षा जास्त होता. आरबीआयचे लक्ष्य 2-6% दरम्यान आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत हे लक्ष्य ओलांडल्यास आरबीआय दर वाढवून हे नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करेल.
विश्लेषकांच्या मते, RBI कोणत्याही प्रकारे महागाईचा दर खाली आणण्याची योजना आखत आहे. खरेतर त्यांच्या लक्षापेक्षा जास्तच महागाई दर राहत आहे. गेल्या दोन तिमाही म्हणजे सप्टेंबर आणि डिसेंबर तिमाहीत महागाईचा दर 6 टक्क्यांहून अधिक आहे.
महागाई का जास्त आहे हे RBI ला सांगावे लागेल
नाणेनिधी समितीने निश्चित केलेले महागाई लक्ष्य कसे अधिक आहे आणि यामध्ये आरबीआय का अपयशी ठरले आहे हे आरबीआयला लेखी सरकारला सांगावे लागेल. RBI ला सुधारणांच्या कारवाईचा सल्ला देण्याचीही गरज असेल. RBI समोर एक अडचण आहे की, जर त्यांनी सुधारणांसाठी कोणताही दर वाढवला तर हे आशियातील तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत नवीन रिस्क घेतल्यासारखे असेल.
महागाईवर किती वेळात नियंत्रण आणता येईल हे देखील सांगावे लागेल
कायद्यानुसार RBI ला हे देखील सांगावे लागेल की महागाईवर किती वेळात नियंत्रण आणता येऊ शकेल. वाढीसाठी आरबीआयने गेल्या सलग चार बैठकीत दर अबाधित ठेवले आहेत. यावेळी त्यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी अतिरिक्त लिक्विडिटी देण्याची योजनाही स्वतंत्रपणे जाहीर केली.
खाद्यतेल, डाळ आणि तेलबियांची कस्टम ड्युटी कट
दुसरीकडे सरकारने डाळी, खाद्यतेल आणि तेलबिया या वस्तूंवर कस्टम ड्युटी कमी केली आहे. जेणेकरुन किंमतीचा काही दबाव कमी करण्यात मदत मिळू शकेल. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) डेटा आज येणार आहेत. अशी अपेक्षा आहे की CPI मध्ये किरकोळ घसरण होऊ शकते. ब्रोकरेज फर्मचा अंदाज आहे की, जानेवारीमध्ये CPI चा दर 5.40 टक्क्यांच्या जवळपास राहू शकतो.