बॅन केलेलं TikTok पुन्हा येणार; ‘ही’ भारतीय कंपनी अ‍ॅप खरेदीसाठी इच्छूक

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१३ ।मुंबई । भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह 118 चिनी अ‍ॅप बॅन केले. त्यापूर्वी केंद्र सरकारने टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारखे एकूण 59 अ‍ॅप्लिकेशन बॅन केले होते. दरम्यान, केंद्र सरकारने बंदी आणलेला पबजी (Pubg) हा मोबाईल गेम भारतात परतणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यातच आता भारतात बॅन असलेलं टिकटॉक (TikTol) हे व्हिडीओबेस अॅपदेखील परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Glance parent company InMobi likely to buy Chinese tiktok)

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाईटडान्स (ByteDance) टिकटॉकची प्रतिसपर्धी भारतीय कंपनी glance ला त्यांचं अॅप विकण्याच्या तयारीत आहे. या डीलबाबत सध्या दोन्ही कंपन्यांमध्ये बातचित सुरु आहे. जपानच्या सॉफ्ट बँक ग्रुपने यासंदर्भात पुढाकार घेतला असून त्यांनी चर्चा सुरु केल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

दोन्ही कंपन्यांसाठी सॉफ्ट बँक ग्रुप मोठा गुंतवणूकदार आहे. SoftBank ने ग्लांसची पॅरेंट कंपनी InMobi आणि टिकटॉकची पॅरेंट कंपनी ByteDance दोन्हीमध्ये गुंतवणूक केली आहे. यासंदर्भात तिन्ही कंपन्यांमध्ये बातचित सुरु आहे. परंतु ही बातचित अगदीच सुरुवातीच्या टप्प्यांमधील आहे. या चर्चांमध्ये या तीन कंपन्यांसोबत अजून एक पक्षदेखील आहे.

या चर्चांमध्ये एकूण चार प्रमुख पक्ष (पार्टी) आहेत. पहिली पार्टी बाईटडान्स, दुसरी ग्लांस, तिसरी सॉफ्ट बँक आणि चौथी पार्टी इंडियन अथॉरिटीजची आहे. टिकटॉक कंपनी त्यांचं अॅप पुन्हा एकदा भारतीय मार्केटमध्ये सादर करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. कंपनी सातत्याने इंडियन अथॉरिटीशी बातचित करत आहे. परंतु अद्याप त्यांच्यात सकारात्मक चर्चा झालेल्या नाहीत.

स्थानिक भागीदार शोधण्याचा प्रयत्न
टिकटॉकला भारतात तसेच अमेरिकेतही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जो बायडन प्रशासनाने त्यांना थोडा दिलासा दिला आहे. त्यामुळेच सॉफ्टबँक दोन्ही देशांमध्ये सध्या स्थानिक भागीदार शोधत आहे, जेणेकरून भविष्यात कंपनीला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *