महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१४ । नवीदिल्ली । एफएम रेडिओच्या श्राेत्यांना नवी भेट लवकरच मिळणार आहे. आकाशवाणीवरील न्यूज बुलेटिनला पुन: प्रसारित करणारा एफएम आता रेडिओ जाॅकीद्वारे या बातम्या सादर करू शकेल. रेडिआे दिनाच्या (१३ फेब्रुवारी) निमित्ताने माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या वृत्ताला दुजाेरा दिला.
पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार, रेडिओ वारसा आणि सवयीचा भाग आहे. कार्यक्रमातून लाेकप्रियताही वाढली. आता २०२४ पासू डिजिटल रेडिओ आणण्याची याेजना आहे.मी ग्रामीण भागात राहत हाेताे. रेडिओ ऐकायला इतरांच्या घरी जात. रेडिओ बातम्यांचा श्राेता राहिलाे आहे. मी त्याचा सरावही केला. संभाषणातील स्पष्टतेमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका राहिली.
पंतप्रधानांचा कार्यक्रम ऐकताे. न्यूज ऑन एअर नावाचा अॅप आहे. त्याद्वारे पुण्याच्या बातम्या ऐकताे.खासगी एफएमवर वृत्त प्रसारण कधी हाेईल?खासगी एफएमला आकाशवाणीचे बुलेटिनचे पुन: प्रसारण करण्याची परवानगी आहे. रेडिआे दिनाच्या पूर्वसंध्येला आता एफएम रेडिओ हे बुलेटिन आपल्या आवाजात सादर करू शकतील, अशी घाेषणा केली.