आफ्रिकेतील गिनी या देशात 5 वर्षांनी जीवघेणा इबोला विषाणू पसरला

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१६ । कोनाक्री । कोरोना संकटादरम्यान पश्चिम आफ्रिकेतील गिनी या देशात 5 वर्षांनी जीवघेणा इबोला विषाणू फैलावला आहे. या विषाणूने आतापर्यंत 4 बळी घेतले असून चौघे अद्याप संक्रमित आहेत. इबोलाचा धोका पाहता गिनी सरकारने विषाणू संक्रमणाला महामारी घोषित केले आहे. गोउइगेमध्ये एका अंत्यसंस्कारात सामील झाल्यावर 7 जणांना अतिसार, उलटय़ा व रक्त पडण्याची समस्या होऊ लागली होती.

गोउइके हे लायबेरियाच्या सीमेवर असून सर्व लोकांना विलगीकृत करण्यात आले आहे. बाधितांवर उपचार सुरू आहेत. या संकटाचा आंतरराष्ट्रीय आरोग्य मापदंडांनुसार सामना केला जात असल्याची माहिती गिनीच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.गिनीमध्ये 2013-2016 मध्ये इबोला विषाणू फैलावला होता. या महामारीने पश्चिम आफ्रिकेत आतापर्यंत 11,300 जणांचा बळी गेला आहे. बहुतांश मृत्यू गिनी, लायबेरिया आणि सिएरा लिओनमध्ये झाले आहेत. तर आफ्रिकेतील आणखीन एक देश कांगो प्रजासत्ताकमध्ये इबोला विषाणू वेगाने फैलावत आहे. कांगोमध्ये दोन नव्या लसींच्या वापरानंतरही आतापर्यंत 2260 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू ओढवला आहे.

1976 मध्ये सर्वप्रथम या विषाणूसंबंधी उलगडा झाला होता. तर 2014-16 मध्ये पश्चिम आफ्रिकेत याचे संक्रमण सर्वाधिक होते. हा विषाणू कालौघात उर्वरित देशांपर्यंतही पेहोचला. सीडीएसनुसार इबोलाने संक्रमितांमधील मृत्यूदर सरासरी 50 टक्के होता. इबोला विषाणू स्पर्श, डोळे, नाकाने फैलावत होता, पण तो कोविड-19 पेक्षा कमी संक्रामक होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *