अकरावीच्या तब्बल इतक्या जागा रिक्त, अद्यापही प्रवेशाविना आहेत हजारो विद्यार्थ्यां

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१८ । मुंबई ।अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदाही रित्त राहणाऱया जागांची संख्या कायम असल्याचे चित्र दिसून आले आहे. मुंबईत तब्बल 97 हजार जागा रिक्त असल्याची माहिती शिक्षण उपसंचालकांकडून देण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण 2 लाख 23 हजार 651 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून अद्याप 36 हजार 358 विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेले नसल्याचे यावेळी समोर आले आहे. दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी एकूण 2 लाख 60 हजार 9 विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता अर्ज केला असल्याचे दिसून आले आहे.

अकरावीच्या प्रवेशात गेल्यावर्षी मुंबई विभागात 3 लाख 26 हजार 796 जागा होत्या त्यापैकी 1 लाख 8 हजार 71 इतक्या जागा शिल्लक राहिल्या होत्या यंदा तवर्षीच्या तुलनेत 11 हजार जागा कमी शिल्लक राहिल्या असल्या तरी यावर्षी सुमारे 6 हजार जागा कमी झालेल्या होत्या. यामुळे दरवर्षी शिल्लक राहणाऱया जागांची संख्या मात्र भरमसाठ आहे. शालेय शिक्षण विभागाकडून स्वयंअर्थसहाय्य माध्यमातून नव्या महाविद्यालय तसेच तुकडय़ांना मान्यता देवून जागांची वाढ झालेली आहे. या वाढीव जागावर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुक नसताही दरवर्षी या जागा आहेत.

– यंदा मुंबई महानगरक्षेत्रात सुमारे 800 कनिष्ठ महाविद्यालयात 3 लाख 20 हजार 750 इतकी प्रवेश क्षमता होती. या जागांवर 1 लाख 73 हजार 881 प्रवेश पेंद्रीय ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात आले.

– तर कोटय़ातील प्रवेश 49 हजार 770 देण्यात आले. असे मिळून 2 लाख 23 हजार 651 प्रवेश पूर्ण झाले तर शिल्लक जागा 97 हजार 99 इतक्या राहिल्या आहेत. यामध्ये शाखानिहाय सर्वाधिक जागा रिक्त या वाणिज्य शाखेच्या 43 हजार 552, विज्ञान शाखेच्या 35 जार 743 आणि कला शाखेच्या 15 हजार 186 जागा रिकामी राहिल्या आहेत. ऑनलाइन मधील 77 हजार 212, कोटयातील 19 हजार 887 जागा रिकाम्या राहिल्या आहेत.

– अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या कोटयातही इनहाऊस कोटय़ातील 4397, अल्पसंख्याक 10 हजार 934 आणि व्यवस्थापन कोटयातील 4 हजार 556 जागा रिकामी राहिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *