पेट्रोल डिझेल दरवाढीला मागील सरकार कारणीभूत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१८ । नवीदिल्ली । देशात पेट्रोल आणि डिझेलने शंभरी पार केली असून सर्वसामान्यांना या दरवाढीचा चटका बसत आहे. या दरवाढीला यूपीए सरकार कारणीभूत आहे. मागील सरकारने जर उर्जा आयातीवर लक्ष केंद्रित केले असते तर ही वेळ आली नसती असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी ओलांडत असताना केंद्र सरकारवर सर्वसामान्यांची नाराजी वाढत आहे. मात्र दरांची स्थिती ही आयातीवर अवलंबून असून मागील सरकारने उर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत केलं असतं तर मध्यमवर्गीयांना अडचण आली नसती. २०१९-२०२० मध्ये भारताने इंधनाची देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी ८५ टक्के तेल आणि ५३ टक्के गॅसची आयात केली, असे मोदी म्हणाले.

तामिळनाडूमधील एन्नोर-तिरुवल्लूर-बेंगळुरू-पुदुच्चेरी-नागपट्टिनम-मदुराई-तूतीकोरिन नॅचरल गॅस पाइपलाइनच्या रामानाथपुरम-थुथुकुडी विभागाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी बोलत होते. ‘आपण इंधनाच्याबाबती आयातीवर इतके का अवलंबून असले पाहिजे? आपण या विषयाकडे अधिक लक्ष दिले असते तर मध्यमवर्गाला हा बोजा उचलावा लागला नसता,’ असे ते म्हणाले. देशात पेट्रोलची किंमत पहिल्यांदाच १०० रुपयांच्या पुढे गेली. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलचा दराने शंभरी गाठली. तर मध्य प्रदेशात ते शतकाच्या अगदी जवळ पोहोचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *