कोरोना अलर्ट ; भारत पुन्हा जगातील टॉप-15 संक्रमित देशांच्या यादीत सामिल ; महाराष्ट्रासह 9 राज्यांमध्ये अ‌ॅक्टिव्ह प्रकरणे पुन्हा वाढले

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२१। दौंड। कोरोनाविषयी काळजी वाढवणारे वृत्त आहे. देश पुन्हा एकदा जगातील टॉप 15 देशांच्या यादीत सामिल झाला आहे. या 15 देशांमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त प्रकरणे आहेत. म्हणजेच असे रुग्ण यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. भारत या यादीमध्ये 15 व्या क्रमांकावर आला आहे. 30 जानेवारीला पोर्तुगाल, इंडोनेशिया आणि आयरलँडला मागे टाकत 17 व्या नंबरवर पोहोचले होते. तेव्हा आशा होती की, लवकरच जगातील टॉप-20 संक्रमित देशांच्या यादीमधून बाहेर पडू शकतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण पुन्हा एकदा वाढत आहेत. यामुळे भारत आता पुन्हा जगातील सर्वात संक्रमित देशांमध्ये सामिल झाला आहे.

अॅक्टव्ह प्रकरणांमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. येथे सध्या 92 लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहे. फ्रान्समध्ये 32 लाख आणि यूकेमध्ये 16 लाखांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या व्यतिरिक्त या यादीमध्ये ब्राझील, बेल्जियम, स्पेन, इटली, रशिया, मॅक्सिको, पोलँड, आयरलँड, इडोनेशिया, अर्जेटिना आणि भारताचाही समावेश आहे.

शनिवारी देशात 13 हजार 919 नवीन रुग्ण आढळले. 11 हजार 412 लोक बरे झाले आहेत आणि 89 जणांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे ओव्हरऑल अॅक्टव्ह रुग्णांमध्ये 2486 ची वाढ झाली आहे. 9 राज्य आणि केंद्रशासित राज्य असे आहेत, जेथे बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, पुद्दूचेरी, त्रिपूरा आणि चंदीगडचा समावेश आहे.

आतापर्यंत 1.09 कोटी रुग्ण
देशात आतापर्यंत 1 कोटी 9 लाख 91 हजारांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 1 कोटी 6 लाखांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. तर 1 लाख 56 हजार 339 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 लाख 42 हजार 691 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *